एच. जे. थीम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

जळगाव, प्रतिनिधी  । इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम महाविद्यालय मेहरूण  येथे माजी  विद्यार्थी मेळावा डॉ. अब्दूल करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

 

माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे  म्हणून संस्थेचे सचिव एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. अमानुल्ला शाह,  अल्हाज अमीन बादली वाला,  अब्दुल गनी मेमन, अ. अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह, तारिक शेख अब्दुल  रऊफ, उपस्थित होते. सुत्रसंचालन मिर्झा आसिफ इक्बाल  यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय व कार्यक्रमाची रूप रेषा क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांदखा यांनी मांडले.  त्यानंतर माजी विद्यार्थी अध्यक्ष वसीम खलील यांनी माजी विद्यार्थी यांनी समाजप्रती आपले कर्तव्य याबाबत माहिती दिली.  उप प्राचार्य प्रा. पिंजारी  यांनी  मत व्यक्त केले.   यावेळी सय्यद अल्ताफ अली, प्रा. आसिफ खान, ॲड.शरीफ, एजाजोद्दीन कबिरोद्दीन , अब्दुल गनी मेमन, एजाज अब्दुल गफार मलीक, डॉ. अमानुल्लाह शाह, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   प्रा.डॉ.आसिफ खान यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी एक ऑफिसची सोय करावी असे निवेदन दिले. त्याला पूर्ण करण्याचे आश्वासन डॉ.करीम सालार यांनी दिले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अब्दुल सालार यांनी म्हटले की,  आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्थेसाठी आपल्याला जी शक्य होईल ती मदत संस्थेला करा असे आवाहन केले.  या कार्यक्रमात जळगाव जिल्हा येथील प्राथमिक शाळा , विद्यालय येथील शिक्षक, मुख्याध्यापक, उद्योजक, वकील, डॉक्टर, आदींची उपस्थिती होती. त्यात डॉ. तब्रेझ, शेख असगर, सय्यद मंजूर, सय्यद झुल्फिकार, रेहान सालार, याकूब शेख, शेख आरिफ  आदींची उपस्थिती होती.याश्वितेसाठी प्रा. पिंजारी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. अमीन काझी, फरहान शेख अब्दुल रऊफ, डॉ. इरफान, प्रा. मुजमिल काजी, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान, यांनी परिश्रम घेतले. आभार ॲड. अजीम शेख  यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!