एक्सीलेंट यंग सोशल वर्कर पुस्काराने अन्वर खाटीक सन्मानित

यावल , प्रतिनिधी | चाळीसगाव येथे मुस्लिम खाटीक समाजाच्यावतीने यावल राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अनवर खाटीक यांना ‘एक्सिलेंट यंग सोशल वर्कर’ या राज्यस्तरीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

 

चाळीसगाव येथील खानदेश मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगावचे युवा उद्योजक मोहसिन शेख मुनाफ खाटीक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुण चाळीसगावचे समाजसेवक वर्धमान धारीवाला, महाराष्ट्र एज्युकेशन चेअरमन शकील सर खाटीक, खाटीक समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी हुसनोद्दीन मालेगाव, राष्ट्रवादी काॅग्रेस शहराध्यक्ष अब्बास खाटीक, युनुस खाटीक, सलिम खाटीक, आयोजक कैसर खाटीक, अफसर सर खाटीक, शकील हाजी, नगरसेवक गफुर पहेलवान, इकबाल सेठ, नाशिकचे आरीफ इजिनिअर, कन्नडचे पंचायत समिती उपसभापती डा. सिकद्दर खाटीक, जळगावचे इब्राहीम शेठ, पाचोरा येथील जाकीर खाटीक, गिरडचे गयास खाटीक , युनुस एलाईसी ,धुळे येथील सलिम सर, चाळीसगावचे रमजान खाटीक जळगावचे अलताफ पुढारी, महेमुद खाटीक, निहाल खाटीक, नजम्मोद्दीन खाटीक उपस्थित होते. यावल तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अन्वर खाटीक यांचा राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मान झाल्या बद्दल यावल राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले, युवक राष्ट्रवादीचे अॅड. देवकांत पाटील , वसंत पाटील , गनी भाई , अय्युब सर, नरेन्द्र शिंदे , ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे, डॉ. हेमंत येवले , नाना बोदडे, गोलु महाजन यांनी खाटीक यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!