एका लहान बाळासह मुकबधीर महिला सापडली

महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याबाबत पोलिसांचे आवाहन

जळगाव/पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत २३ फेब्रुवारी रोजी एक मुकबधीर महिला ही लहान बाळासह मिळून आली आहे, या दोघांना जळगावातील शासकीय आशादीप वसतीगृह येथे दाखल करण्यात आले असून या महिलेच्या नातेवाईकांचा,  वारसाचा शोध घेण्याबाबतचे आवाहन  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी केले आहे.

 

मुकबधीर महिलेचे वय ३५ ते ४० वर्ष असून तिच्या उजव्या हातावर रेवती असे तर डाव्या हातावर ठेरनिमो आजगीया असे गोंदलेले आहे. तसेच तिच्यासोबत तीन वर्षाचे लहान बाळ आहे, महिलेस कोणी ओळखत असल्यास अथवा तिच्या वारसाबाबत, नातेवाईकांबाबत कुणालाही काही एक माहिती असेल, तर त्यांनी आशादीप वसतीगृह येथे संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी संपूर्ण जळगाव जिल्हयातील नागरिकांना केले आहे, याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी पत्रका परिषदेत दिली आहे, तसेच कुणालाही महिलेबाबत अथवा तिचे नातेवाईक अथवा वारसाबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील किव्हा ०२५७ २२२१७९० या क्रमाकांवर संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content