एकतर्फी प्रेमातून तरुणाने केला विवाहितेचा खून !

शेअर करा !

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विवाहितेची चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड परिसरातील अजंठानगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात राणी लांडगे नामक २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

store advt

 

 

महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार केले. महिलेवर वार करणारा अरविंद गाडे (वय ३०) व्यक्ती जखमी झाला आहे. मयत महिला राणी आणि आरोपी अरविंद हे शेजारी राहत होते. दरम्यान, त्यांच्यात ओळख झाली. अरविंद हा राणी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. राणी यांच्यावर चिडलेल्या अरविंद याने शनिवारी हल्ला केला. राणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अरविंद याने स्वतःवरही वार करून घेतले आहेत. त्याच्यावर पिंपरीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!