उज़मा बहुउद्देशीय संस्थेच्या दुसऱ्या कोरोना मार्गदर्शन केंद्रचे उद्घाटन

शेअर करा !

जळगाव:, प्रतिनिधी । येथील उज़मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव याच्या पार्श्वभूमीवर कोविड विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ चला,जीवन जगूया.. कोरोना सोबत’ या विशेष मोहिमेअंतर्गत डॉ. नदीम नज़र यांच्या अनस क्लिनिक,शाह अवलिया मस्जिद जवळ येथे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख ह्यांच्य हस्ते कोरोना मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कोरोना मार्गदर्शन केंद्रांचे उद्दिष्ट व्यक्त करतांना उज़मा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. अल्तमश हसन यांनी सांगितले की, केंद्रांमार्फत कोरोना बाधित रुग्ण व नातवाइकांना योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाईल. सामान्य नागरिकांचे समुपदेशन करून योग्य तो सल्लाही दिला जाईल. ह्या वेळी हयात हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ञ डॉ अनीस शेख व सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी ही मत व्यक्त करतांना उज़मा बहुद्देशीय संस्थाच्या कोरोना जनजागृी मोहिमेची प्रशंसा केली. यावेळी आरीफ शाह हनीफ शाह ही उपस्थित होते. डॉ. नदीम नज़र यांनी आभार व्यक्त केले.

store advt
आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!