उषा हिंगोणेकर यांच्या काव्यसंग्रहास मातोश्री कै.सौ.केवळताई मिरेवाड वाड़मय पुरस्कार जाहिर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघर’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २०२१ विभागून कै.सौ.केवळताई मिरेवाड यांच्या स्मृति प्रित्यर्थ मराठी साहित्यातील कविता या वाड़मय प्रकारातून जाहिर झाला आहे.

पुरस्कारात २००० रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दि. १३ नोव्हेंबर २०२२ ला नायगाव जिल्हा नांदेड येथे एका विशेष समारंभात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव पाटील, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी, समिक्षक डॉ. माधव पुटवाड, सेवानिवृत्त न्यायाधिश एम.जी.गायकवाड, प्राचार्य रमेश कदम यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

असे एका निवड प्रसिद्धी पत्रकान्वये संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी कळविले आहे. सदरहू पारितोषिक प्राप्त काव्यसंग्रह धगधगते तळघरकाव्य संग्रहास यापूर्वी एकूण ८ प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.