उमेश जावळे यांची कॉंग्रेस कमेटी प्रदेश चिटणीसपदी निवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील उमेश जावळे यांची  कॉंग्रेस कमेटी प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चिटणीसपदासाठी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षासाठी संघटन वाढीसाठी व पक्षाच्या प्रसार प्रचार या कार्यात लक्ष वेधणारे कार्य केल्याबद्दल यावल तालुक्यातील युवा कार्यकर्त उमेश जावळे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. उमेश जावळे यांच्या या निवडीचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हा अध्यक्ष संदीप भैय्या पाटील ,रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, खरेदी विक्री संघाचे संचालक व माजी चेअरमन आर जी पाटील ( नाना ) ,काँग्रेसचे शहरा अध्यक्ष कदीर खान , शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, मारूळ सरपंच आबीद सैय्यद जावेद , दहिगाव सरपंच अजय अडकमोल, बामणोद सरपंच राहुल तायडे , यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी व माजी उपसभापती उमाकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सरफराज तडवी , कलीमा सायबु तडवी आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!