उमाळ्याजवळ कारची दुचाकीला धडक तरुण जखमी

 

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद-जळगाव रोडवरील चिंचोली ते उमाळा दरम्यान सुसाट कारचालकाने शेतकऱ्याच्या दुचाकीला धडक दिल्याची घटना ७ जानेवारी रोजी तीन वाजता घडली होती. अपघातात गंभीर जखमी रुग्णालयात असल्याने आज जबाब दिल्यावरुन कारचालका विरुद्ध गु्न्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारी नुसार शेतकरी तरुण अजय देविदास पवार (वय-२५ रा.चिंचोली) हा त्याच्या दुचाकीने चिंचोली कडून उमाळ्या कडे जात असतांना सुसाट कार (एमएच.१२जे.यु.८७७०) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थीती कडे दुर्लक्ष करुन दुचाकीला धडक दिली. अपघातात अजय पवार गंभीर जखमी होवुन त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्यावरुन कार चालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.

Protected Content