उभ्या ट्रकला रिक्षा धडकली; एकाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । कामावरून रिक्षा घरी जात असतांना रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला धडक दिल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, रविंद्र मधुकर जोशी (वय-४०) रा. एमडीएस कॉलनी, रामेश्वर कॉलनी हे एमआयडीसी कंपनीत मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात असतांना जळगाव औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी ५२२९) वर रिक्षा आदळली. यात चालकासह रविंद्र जोशी हे गंभीर जखमी झाले. रविंद्र जोशी यांना गंभीरवस्थेत तातडीने देवकर कॉलेज शासकीय रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी मृत घोषीत केले. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी रस्त्यावरील ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालक फरार झाला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!