उपोषणार्थी गीतांजलीताई कोळी यांची तब्येत खालावली !

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून दिनांक २५ एप्रिल पासून उपोषणाला बसलेल्या गीतांजलीताई कोळी यांची तब्येत खालावल्यामुळे मुळे पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

 

गीतांजली कोळी यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते हिराभाऊ कोळी हेही दिनांक २५ एप्रिल पासून प्राणांकीत उपोषणाला बसलेले आहेत. सदर उपोषणाचा आजचा बारावा दिवस असून जिल्हा प्रशासनाने सदर उपोषण गंभिरतेने न घेतल्याने कोळी समाजात नाराजी व्यक्त होत आहे.

 

धुळ्याचे सध्याचे जिल्हाधिकारी जलद शर्मा पूर्वी जळगावात उपविभागीय अधिकारी होते त्यावेळी त्यांनी टोकरे कोळी जमातीचे अनेक जात प्रमाणपत्र दिली आहेत त्या प्रमाणे धुळे येथील टोकरे कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळावीत अशी मागणी होत आहे. तर, दुसरीकडे प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने समाजबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content