उद्या हॉस्पीटल्स वेलफेअर असोसिएशनतर्फे आरोग्य सेवा मंथन परिषद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजना राबवविणारे हॉस्पिटलकरिता हॉस्पिटल वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यतर्फे उद्या रविवार दि. २९ रोजी आरोग्य सेवा मंथन परिषदेचे आयोजन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, स्वागताध्यक्षपदी डॉ. अनिल पाटील, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून हॉस्पिटल वेलफेअर असो. म.रा. चे अध्यक्ष डॉ. जे. टी. पोळ हे उपस्थीत राहणार आहे. या परिषदेत रूग्णांची सेवा करतांना अनेक अडचणी येतात अशा वेळी शासन योजना राबवणाऱ्या इन्शुुरन्स कंपनी आणि हॉस्पिटलमध्ये समन्वय कसा साधावा याबाबत मंथन होणार आहे. सदर परिषद डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये दोन सत्रात संपन्न होणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!