मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी जन्माला आलेले नाही. ते नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले. शंभर दिवसांच्या कामाविषयी आणि राज्यासह देशातील राजकीय घडामोडींविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला मुलाखत दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारसह आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडले.