उद्धव ठाकरे सेना जिल्हाभरात करणार दिड लाख नवीन सभासद नोंदणी 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात गेल्या चार महिन्यांपासून शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० आमदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने नविन शिवसेनेची स्थापना केल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी नुकतीच मुंबईत खासदार विनायक राऊत व संजय मिर्लेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्यात नवीन सदस्य नोंदणी करण्याच्या सुचनाही देवून जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार नविन सभासद नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ‌

जळगाव जिल्ह्यात १५ तालुके असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नाव तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांना जबाबदारी नेमुन दिली आहे. यात जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत, हर्षल माने, विष्णू भंगाळे, समाधान महाजन यांच्या सह उपजिल्हा प्रमुख तालुका यांनी प्रत्येक तालुक्यात १० हजार या प्रमाणे जळगाव जिल्ह्यात दिड लाख नवीन सभासद नोंदणी फॉर्म भरून घ्यावयाचे आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. जिल्ह्यात दिड लाख नवीन सभासद नोंदणी करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून चारही जिल्हा प्रमुखांकडून फॉर्म भरण्यास सुरुवात झाल्याचेही दिपकसिंग राजपूत यांनी सांगितले.

Protected Content