उत्तर प्रदेशात भीषण अपघात ; 13 जण ठार, 18 जखमी

शेअर करा !
Accident
 

फिरोजाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाला तर 18 लोक गंभीर जखमी झाले.

 

या संदर्भात अधिक असे की, बस दिल्लीहून मोतिहारी(बिहार)कडे जात होती. साधारण रात्री १० वाजेच्या सुमारास बसने फिरोजाबाद येथे रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील १३ लोकांचा मृत्यू झाला तर १८ लोक गंभीर जखमी झाले. या बसमध्ये साधारण ४० ते ५० प्रवाशी असल्याचे कळते. जखमींना सैफईच्या पीजीआयमध्ये दाखल केले आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेली माहिती नुसार अपघातानंतर 31 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 13 जणांचा मृत्यू झाला, सध्या 18 जणांवर उपचार सुरु आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!