जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
सामंत यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शुक्रवार, 18 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता श्री. गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेड येथून चार्टड विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. चार्टड विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 ते 3.30 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आढावा बैठक. (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सायंकाळी 4.30 वा. पत्रकार परिषद (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सायंकाळी 5.30 वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व चार्टड विमानाने औरंगाबादकडे प्रयाण.