ईद मंगळवारी साजरी करण्याचा सून्नी रुयते हिलाल कमिटीचा निर्णय

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आज सोमवारी चांदरात राहणार असून उद्या मंगळवार दि. ३ मे रोजी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) साजरी करण्याचे सुन्नी रुयते हिलाल कमिटी च्या बैठकीत ठरविण्यात आले.

 

संपूर्ण भारतात कुठेही चांद ची शहादत ( चंद्रदर्शन झाल्याची साक्ष) म्हणजे चंद्र दर्शन न झाल्यामुळे उद्या सोमवारी रोजा राहणार असून रमजानचे संपूर्ण ३० रोजे पूर्ण होणार आहेत. आज सोमवारी चांदरात राहणार असून उद्या मंगळवार दि. ३ मे रोजी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) साजरी होणार आहे. असे सुन्नी जामा मस्जिद नियामतपुरा येथे आयोजित सुन्नी रुयते हिलाल कमिटी च्या बैठकीत ठरविण्यात आले. या संगी सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मुफ्ती रेहान रझा, मौलाना वासेफ रझा, मौलाना नौशाद साबरी, मौलाना अतिक रझा, मौलाना मुफ्ती हसनैन रझा, इकबाल वझीर, मुख्तार शाह, शाकीर चित्तलावला, मोईनुद्दीन काकर, सय्यद जावेद आदी उपस्थित होते. दरम्यान, सुन्नी ईदगाह मैदान नियाज अली नगर, जळगाव या ठिकाणी सकाळी ठीक ८.१५  वाजता अदा (पठण ) केली जाणार असून सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी नमाज – ए – ईद-उल-फित्र अदा करण्यासाठी साठी वेळेवर सुन्नी ईदगाह मैदानावर पोहोचावे असे आवाहन सुन्नी ईदगाह ट्रस्ट व सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, इकबाल वजीर, मुख्तार शाह, मोईनुद्दीन काकर, मुफ्ती रेहान रझा यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!