जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इव्हेंट मॅनॅजमेण्ट विभाग,कृती फॉउंडेशन व चांडक कॅन्सर केअर हॉस्पिटल जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅमिली अन्ताक्षरी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जळगांव जिल्ह्यातील 25 फॅमिली यांनी सहभाग घेतला होता. त्या मधून 3 फॅमिली विजेत्या ठरल्या.
प्रथम रणधीर इंगळे फॅमिली, द्वितीय गौरव मेहता फॅमिली,तृतीय बिवस सहा फॅमिली यांना ट्रॉफी, गिफ्ट व पैठणी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन शशिकांत वदोडकर ( सांस्कृतिक समन्वयक के. सी. ई सोसायटी जळगांव ) यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पी ई तात्यासाहेब पाटील डॉ. निलेश चांडक व डॉ. श्रद्धा चांडक (चांडक कॅन्सर हॉस्पिटल जळगांव )अमित माळी (जळगांव जिल्हा पोलीस दल ) व डॉ. श्रद्धा माळी (माधवबाग हॉस्पिटल जळगांव ) विशाल सुरेश भोळे (उद्योजक )व डॉ. जुही भोळे ऍड. महेश भोकरीकर व ऍड.रुपाली भोकरीकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व विद्यार्थी यांनी काम पाहिले.