इंडिया स्टील कारखान्यात स्फोट ; दोन कामगारांचा जागीच मृत्यू

शेअर करा !

खोपोली (वृत्तसंस्था) खोपोली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर, एक जखमी झाला आहे.

store advt

 

 

प्रमोद दूधनाथ शर्मा (३०) व दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) असे जखमी कामगाराचे नाव आहे. मृत कामगारांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. तर, जखमी सुभाष वांजळे यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यात मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!