आ.बं. मुलांच्या हायस्कूलमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील आ.बं.मुलांच्या हायस्कूलमध्ये युवा सप्ताह अंतर्गत सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन नारायण अग्रवाल यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

या कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आ.बं. हायस्कूल चे बाहेरील पटांगण पूर्ण भरलेले होते आणि अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले. १२ जानेवारी पासून सुरू झालेल्या ७ दिवसात राजमाता जिजाऊ जयंती रॅली, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर व्याख्यान, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात क्रिकेट मॅच,बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा, गीत गायन,योगा चे प्रशिक्षण असे विविध व्यक्ती विकासमत्क कार्यक्रम आयोजित केले गेले,प्रसंगी संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तथा सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content