आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी विकासकामांना प्रारंभ

पारोळा, प्रतिनिधी | नुकतेच पारोळा शहरासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी मंजुर ४ कोटी रूपयांची विकासकामांचे भव्य भुमीपुजन सोहळा संपन्न होवून प्रत्यक्षात कामांना सुरूवात देखिल करण्यात आली आहे.

४ कोटी रूपयांची विकासकामांच्या भुमीपुजनांप्रसंगी आ. चिमणराव पाटील यांनी नागरीकांना ठोस आश्वासित केले होते. त्यांनी नगरपरिषदेची एक हाती सत्ता दिल्यास शहरासाठी ४०० कोटींचा निधी आणून शहराचा पुर्णपणे कायापालट करू. त्याच पार्श्वभूमीवर दि. ३ नोव्हेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचा शासन निर्णयान्वये पारोळा नगरपरिषद हद्दीत गट नं.२४४/२ (सर्वे नं.३४४ चा भाग) येथे जलतरण तलाव इमारतीसह बांधकाम करणे यासाठी तब्बल २.५० कोटी रूपये निधी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झाले आहेत. या कामामुळे शहरातील लहान्यांसह तरूणांना पोहोण्यासाठी कायमस्वरूपी एक इमारत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जलतरणाची आवड निर्माण होवुन शरिरासाठी आवश्यक त्या जलतरण तालिमेसाठी मोठी मदत होणार आहे. यापुढेही शहरातील मुलभुत व आरोग्यविषयक विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशिल राहू. जलतरण तलावापेक्षाही मोठी विकासकामे हाती घेण्याचा मानस असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!