मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्व:खर्चाने अंगणवाडी मधील चोरीला गेलेले ताट, वाट्या, चमचे, कुकर आदी साहित्य खरेदी करत शिवसेना महिला पदाधिकारी यांचे हस्ते आज सुपूर्द केले.
मुक्ताईनगर शहरातील अंगणवाडी क्रं.01 (उर्दू शाळा क्रं-2, सीड फार्म एरिया) मधील साहित्य चोरीला गेल्याची तक्रार अंगणवाडी सेविका साधना पगारे यांनी पोलिस स्टेशन ला केली आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सदर माहिती दिली होती.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी केलेल्या मदतीचे भरभरून कौतुक केले आणि आभार मानले. सदर उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
प्रसंगी शिवसेना महिला पदाधिकारी- कल्पना पालवे जिल्हा संघटक, सरिता कोळी शहर संघटक, यशोदा माळी उपशहर संघटक, ज्योती मालचे, सीमाताई पुजारी, नगरसेवक राजुभाऊ हिवराळे (शहर प्रमुख), निलेश शिरसाठ, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल पाटील, स्वप्नील श्रीखंडे, रवी दांडगे, जफर अली, शकील मेम्बर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख भिकन, शरीफ तडवी, शाळा समिती अध्यक्ष रौफ मण्यार, अंगणवाडी सेविका साधना पगारे, मदतनीस सुरेखा महाजन आदी उपस्थित होते.