आ. गुलाबराव पाटील यांची उपनेतेपदी निवड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांची शिंदे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाची आज हॉटेल ट्रायडंट इथं बैठक पार पडली या बैठकीत नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. यासोबत नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत उपनेतेपदी माजी मंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री उदय सामंत यांच्यासह यशवंत जाधव, शिवाजीराव अढळराव पाटील, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा यांनी निवड करण्यात आली आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे हे कायम राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे बहुसंख्य खासदार हे ऑनलाईन पध्दतीत उपस्थित असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आ. गुलाबराव पाटील हे शिवसेनेत आधी देखील उपनेतेपदी कार्यरत होते. या अनुषंगाने त्यांना शिंदे गटाने पुन्हा एकदा या पदावर नियुक्त केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: