आसोदा येथे माजी सैनिकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । घरात कोणीही नसतांना छताला दोरीने माजी सैनिकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

store advt

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश भिकन कोळी (वय-४५) रा.तुरखेडा ता.जळगाव ह.मु. आसोदा भादली ता.जि.जळगाव हे बीएसएफमध्ये जवान होते. दोन वर्षांपूर्वी ते सैन्यातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर ते एस.टी. डेपोत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. पत्नी, मुलगा व मुलगी घराच्या पुढच्या गॅलरीत बसले होते. त्यांनी मागच्या घरात जावून नॉयलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. गळफास घेतल्याचे कुटुंबियांना दुपारी १.३० वाजेच्या सुमारास लक्षात आले. पतीने आत्महत्या केल्याचे पाहताच पत्नी कल्पना कोळी यांनी हंबरडा फोडला. आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला. तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती तालुका पोलीसांना दिल्यानंतर जिल्हा रूग्णालयात येवून पंचनामा केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत गणेश कोळी यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा राहूल आणि मोठी मुलगी पूनम असा परिवार आहे.

error: Content is protected !!