ठरल्यानुसार पद न मिळाल्याने राजन लासूरकरांचा राजीनामा

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय पॅनल ठरल्याप्रमाणे वागले नाही म्हणून राजन लासुरकर यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे

राजन लासुलकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे की, रावेर खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय पॅनलचे वर्चस्व होते. यामध्ये दोन चेअरमन व पाच व्हाइस चेअरमन असे सर्वानुमते ठरले असतांना व्हाइस चेअरमन पदासाठी माझा नंबर असतांना अल्पसंख्याक असल्याने मला डावलण्यात आल्याचा आरोप राजन लासुलकर यांनी केला आहे. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा खरेदी विक्री संघाचे चेअरमन यांचे कडे सुपूर्त केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.