आम्ही सर्व ठिकाणी सतर्क : नाना पटोले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला पक्ष प्रत्येक ठिकाणी सतर्क असल्याचे वक्तव्य केले आहे.

 

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडतांना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याव्यतिरिक्त आमचा प्लॅन बी म्हणजे आम्ही सगळ्या ठिकाणी सतर्क आहोत, असे वक्तव्य कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.  नाना पटोलेंनी वेळोवेळी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची चांगलीच चर्चा होताना दिसते. महाविकास आघाडीत कॉंग्रेस एकीकडे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरेंची सेना एकीकडे असे चित्र पाहावयास मिळते. याआधी पटोलेंनी महाविकास आघाडी न झाल्यास कॉंग्रेसचा प्लॅन बी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी त्या प्लॅन बी आणि मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे.

 

नाना पटोले म्हणाले, आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची आपल्या लोकशाहीची परंपरा आहे. प्लॅन ‘बी’विषयी बोलायचे झाल्यास, ज्या पद्धतीने २०१४ मध्ये कॉंग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आता आम्ही सतर्क आहोत. महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा कॉंग्रेस सतर्क असेल, असे पटोले म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content