आमदार शिरीष चौधरींच्या उपस्थितीत आदिवासी तरुणांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत अनेक आदिवासी तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आज दि. ७ जानेवारी रोजी कॉंग्रेस पक्षात आदिवासी तरुणांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , जिल्हा परिषदचे गटनेते तथा कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , युवा नेतृत्व धंनजय शिरीष चौधरी , यावल पंचायत समितीचे गटनेते तथा संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील , यावल तालुका खरेदी विक्री .सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरूड , हिंगोणा ग्रामपंचायतचे माजी सरपंच भुषण राणे , रशीद रसुल तडवी ,मासुम तडवी , इतबार तडवी ,जिल्हा प्रकल्पस्तरिय आढावा समितीचे सदस्य संजय जमादार, काँग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी , रूबाब दगडु तडवी, बाबु तडवी , आरीफ गंभीर तडवी , कबीर सलीम तडवी, सुपडू शाहदुर तडवी , संजय नबाब तडवी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आदिवासी समाज बांधवांच्या शेकडो तरूणांनी आमदार शिरीष चौधरी व पक्षाच्या कार्यावर विश्वास ठेवुन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार चौधरी यांनी प्रवेश करणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचे स्वागत केले .

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!