आमच्यासाठी विषय संपला — फडणवीस

 

नागपूर : वृत्तसंस्था । प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे , अशी प्रतिक्रिया आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली .

 

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या व्हिडीओशिवाय भाजपाकडून अधिकृत अशी भूमिका आली नव्हती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही, आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही,  काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “ओबीसी राजकीय आरक्षणाबद्दल राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकार इंपेरिकल डेटा जमा करण्याऐवजी वेळ काढत आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले म्हणून ते इंपेरिकल डेटा गोळा करणार नाही हे योग्य नाही. कदाचित सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये. माझा दावा आहे की २ ते ३ महिन्यांत इंपेरिकल डेटा राज्यातच गोळा करता येऊ शकतो”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

 

Protected Content