आमचे सरकार इंचभरही इकडे-तिकडे हलणार नाही : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्तांतराची फक्त स्वप्नेच असून आमचे सरकार इंचभरही इकडे-तिकडे हलणार नसल्याचा दावा आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला.

 

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमाांशी बोलतांना भाजला टोला मारला. ते म्हणाले की, सरकार अस्थिर आहेत असं काही मोजके लोकं म्हणत आहेत. त्यांच्या मनातील भीती आणि वैफल्य ते बोलून दाखवत आहेत. जेव्हा ते वारंवार म्हणतात सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना सरकार हलवता येणार नाही. ते पक्कं आणि स्थिर आहे. राज्यातील जे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत, त्यांनाही मनोमन खात्री पटली आहे की काही झालं तरी पुढील तीन वर्षे हे सरकार अजिबात इंचभर सुद्धा इकडे तिकडे हलणार नाही आणि आम्ही सुद्धा हलू देणार नाही असे राऊत म्हटले.

 

दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, गणपतीकडे काय मागणार, नेहमीच सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना सुबुद्धी द्या, अनेकांना सुबुद्धीची गरज आहे. ती गणपतीकडे मागतो. सातत्याने विघ्न कोसळतंय. आपण सगळे कार्यक्रम एका बंधनात साजरे करतोय किंवा करतच नाही. पुढल्या वर्षी गणेश उत्सव साजरं करू, वाजत गाजत गणरायाचं आगमन करू, असं ते म्हणाले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!