आपणच पक्षाचे गटनेते : दिलीप पोकळे यांचा दावा (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी | महापालिकेतील भाजपच्या बहुसंख्य सदस्यांनी मला गटनेता म्हणून निवडले आहे. यामुळे आपणच पक्षाचे गटनेते असून यात फसवणुकाचा संबंधच येत नसल्याची स्पष्टोक्ती बंडखोर गटाचे सदस्य अॅड. दिलीप पोकळे यांनी केली आहे.

 

अॅड. दिलीप पोकळे यांनी खोटे कागदपत्रे सादर केले असून त्यांच्यावर विभागीय आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजप पोकळे विरोधात आम्ही गुन्हा दाखल करू असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे. याला उत्तर देतानाअॅड. पोकळे यांनी  गटनेतेपदाशी विभागीय आयुक्तांचा कोणताही संबंध येत नसून तो स्थानिक आयुक्तांच्या अखत्यारीतील विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. सभागृह नेत्यांच्या बैठकीत गट नेता, उप गट नेता यांची निवड झाली. यानंतर या बैठकीचे इतिवृत्त व कागदपत्रे विभागीय आयुक्त व आयुक्ता व महापौरांकडे दाखल करण्यात आले. काल झालेल्या गट नेत्यांच्या बैठकीला मला बोलविण्यात आले होते,यामुळे हा विषय संपला असल्याचे सूचक वक्तव्य दिलीप पोकळे यांनी केले आहे. विभागीय आयुक्तांनी गट नेता कोण आहे हे कुठेही नमूद केलेले नाही. गट नेता संदर्भात निर्णय देण्याचा कोणताही अधिकार विभागीय आयुक्तांना नसल्याचे मत अॅड. पोकळे यांनी व्यक्त केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!