आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता राज्यभरात राज्य सरकारने म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत.

 

राज्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने म्युकरमायकोसिसला साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट केलं असून त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत.

राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलं आकारत असल्याचं निदर्शनास आलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असा प्रकारांना आळा बसणार आहे.

 

म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

 

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

 

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

 

कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहरं किंवा भाग येतात, यासंदर्भात देखील सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

 

अ श्रेणी – मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)

 

पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी) नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी) , ब श्रेणी – नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.