आता मुख्यमंत्र्यांच्या राज्यभर सभा

८ जूनला औरंगाबाद तर १४ जूनला मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ला होणार सभा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  राज्यात कोठेही निवडणुका नाहीत तरीही मनसेच्या जाहीर, राष्ट्रवादीच्या संकल्प तसेच भाजपच्या बुस्टर सभा होत आहेत.  त्या प्रमाणेच आता मुख्यमंत्री तथा शिवसेन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगामी काळात शिवसेनेच्या राज्यभर सभा होणार असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना कालच एक ऑनलाईन बैठक घेत संदेश दिला आहे. पक्ष संघटना बांधणीत कुठेही मागे राहु नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभेसाठी येणार आहेत. तर १४ तारखेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये सभा घेणार आहेत. आगामी काळात हल्ल्याला प्रतिहल्ला करावाच लागेल. जे बनावट हिंदुत्ववादी आहेत त्यांचे ढोंगाचे बुरखे टराटरा फाडावेच लागतील. आव्हान आमही जाणत नाहीत, आम्ही लढणार आहोत. आणि त्यासाठी महाराष्ट्रात फिरण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला असल्याचे आज शिवसेनेच्या राज्यभरातील संपर्क प्रमुखांना आज ऑनलाईन मार्गदर्शन केले अशी माहिती या बैठकीनंतर खा. संजय राऊत यांनी दिली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: