आता आमदारांच्याच घरासमोर शेतकर्‍यांचे उपोषण !

अमळनेर प्रतिनिधी  अतिवृष्टीसाठी शासनाने जाहीर केलेले अनुदान वेळोवेळी पाठपुरावा करून देखील न मिळाल्याने मारवडसह परिसरातील शेतकर्‍यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या घरासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.

 

मारवड मंडळासह वंचित शेतकरी  बांधवांनी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, सन २०१९(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड  मंडळासह  तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला.मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. सन २०१९(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड  मंडळासह  तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.त्यांनतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला.मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. याबाबत प्रांताधिकारी, आमदार, मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आधीच्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्त कार्यालयाकडे उशिराने म्हणजे २६ मे रोजी पाठविण्यात आल्याने विलंब झाला. आयुक्त कार्यालयाने जूनमध्ये मत्रांलयाकडे याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानंतर हे प्रकरणअर्थविभागाकडे प्रलंबित आहे. अर्थमंत्र्यांच्या टेबलवर हे प्रकरण असून त्यांची स्वाक्षरी झाली की, सानुग्रह मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, या संदर्भात निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.मात्र, कोकणसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टिमुळे हाहाकार उडाला आहे. संपूर्ण मंत्रीमंडळ पूरग्रस्त भागाला भेटी देत आहेत. त्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्यांच्या सानुग्रहाचा प्रश्‍न अजून काही दिवस तरी सुटण्यासारखा नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत. या पार्श्‍वभूमिवर मारवड मंडळासह वंचित शेतकरी  बांधव आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन  हसीलदार मिलिंद कुमार वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत  ता.१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर रोजी तीन दिवस  वंचित शेतकरी सकाळी ११ ते १२ या दरम्यान साखळी उपोषण करण्यात येणार आहे.           मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टिचा सानुग्रह मिळाला नसून या खरिपात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली असून कोरडा दुष्काळ आहे. जून ,जुलै,औगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने पीके वाया गेली.सदयस्थितित पाऊस होउनही  खरीप हंगाम हातातून गेला.हजारो रूपयांचे बियाने ,खते  यात खर्च झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मात्र लोकप्रतिनिधी याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला असून साखली उपोषण बाबत ठाम असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी  नायब तहसीलदार श्री.पवार अमळनेर यांना निवेदन देतांना मारवड परिसरातील शेतकरी श्यामकांत पाटील,  दिलीप पाटील,  शिवाजी  पाटील,  मधुकर पाटील ,शरद साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील ,अमोल पाटील, बाबा सुर्वे ,भगवान पाटील, संदीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!