आडगाव येथे रविवार २२ मार्च रोजी राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धा

आडगाव, प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे संभाजी प्रतिष्टान व आडगाव व्हॉली बॉल क्लबतर्फे रविवार २२ मार्च रोजी राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय शुटींग हॉली बॉल स्पर्धेसाठी चार आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले असून ही स्पर्धा धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे डे-नाईट स्वरूपात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उदघाट्न सकाळी ९.३० वाजता होणार आहे. स्पर्धेचे आयोजन व विशेष सहकार्य धिरज पाटील, सतिश पाटील, रावसाहेब पाटील, जितेंद्र तागड, चंद्रशेखर पाटील, अनंत चौधरी, अनिल पाटील, साहेबराव पहेलवान, गौतम केदार यांचे लाभले आहे. तर स्पर्धा यस्वीतेसाठी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील, हभप मठाधिपती भानुदास महाराज आडगाव, अविनाश पाटील, विकासो आडगाव चेअरमन मधुकर पाटील, डॉ. राजेश पाटील, अनंत चौधरी, डॉ. किरण पाटील, डॉ. प्रवीण वाघ, एरंडोल पंचायत समिती सभापती शांताबाई महाजन, शालिग्राम पाटील, एरंडोल पंचायत समिती माजी उपसभापती ओंकार पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, चंद्रशेखर पवार, शिवसेना एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, शिवसेना शहरप्रमुख रावसाहेब पाटील, आडगाव सरपंच राजेंद्र पाटील आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तरी जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

store advt
error: Content is protected !!