विलास बाबुराव महाजन (वय-३५, रा. खोटेनगर) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील खोटे नगर परिसरातील झाडाखाली विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी देखील होता. या आजारपणाला कंटाळून विलास याने ज्याठिकाणी राहत होता त्याच ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळङ्गास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्या परिसरातील रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालकांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतिष हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह खाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
आजाराला कंटाळून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
2 years ago
No Comments