आजाराला कंटाळून किनगाव येथील वृध्दाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील वयोवृद्ध व्यक्तिने आजारास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवाशी एकनाथ बाबुराव पाटील (वय-८१) हे शेतात जावून येतो असे सांगून सोमवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ८ जून रोजी कासारखेडा शिवारातील रविंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शविविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार होता. हा आजार असहाय्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.