आजपासून यावल तालुक्यात शाळा गजबजल्या (व्हिडिओ)

यावल,  अय्युब पटेल  | तालुक्यातील शाळा आजपासुन गजबजल्या असुन शिक्षक आणि  विद्यार्थी हे विविध शाळांच्या परिसरात आनंद व्यक्त करतांना दिसुन येत होते.

 

शासनाच्या कोवीड १९च्या नियमावलीनुसार काटेकोर पालन करीत शाळा सुरू झाल्या आहे. मागील एक ते दीड वर्षापासुन कोरोना विषाणु संसर्गाच्या संपूर्ण देशात व राज्यात वाढलेल्या प्रसार व प्रार्दुभावामुळे अनेकांना आपला जिव गमवावे लागलेले आहे. याच पार्श्वभूमीवर शासना निर्णयाने राज्यातील संपुर्ण शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या.  मात्र, आता कोरोनाचा प्रार्दुभाव संपुष्ठात येत असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणीक भविष्याचे हित लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तथा शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी दिनांक ४ ऑक्टोबर पासुन राज्यातील सर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने यावल तालुक्यातील १०१ शाळा सुरू झाल्या असुन यात शहरी भागातील १६ प्राथमिक शाळा वेळ ८ते १२ तथा ग्रामीण क्षेत्रातील एकुण ८५ शाळा या १२ ते ५ वाजे पर्यंतच्या वेळेत आज पासुन सुरू झाल्या आहेत. शहरी भागातील १६ शाळांमधील शिक्षक संख्याही २५५ तर विद्यार्थी एकुण पटसंख्या ही ७३१३ अशी असुन यापैक्की आज उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पट संख्याही ५० टक्के %प्रमाणे ५ हजार१०४ हजर होते. ग्रामीण क्षेत्रातील सुरू झालेल्या शाळांची संख्या ८५ असुन तर शिक्षक८२३तर विद्यार्थी २१ हजार  २३९ असुन त्या पैक्की ४८ टक्के %प्रमाणे ९ हजार७२१ विद्यार्थी उपस्थित होते .एकुण २८ हजार५५२ विद्यार्थ्यांपैक्की शाळेच्या पहील्या दिवसी१४ हजार५२५ विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी लावली तर १हजार७८ शिक्षकांनी अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर ज्ञानदानाच्या कार्यात सहभाग घेतला . या वेळी यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईम शेख यांनी आज थेट कोरपावली माध्यमीक शाळा , कोरपावली जिल्हा परिषद उर्दु शाळा , कुसुमताई माध्यमिक विद्यालय फैजपुर आणि फैजपुर बॉईज क्रमांक१ची शाळा या ठिकाणी भेट देवुन विद्यार्थ्यांशी कोवीड१९च्या नियमांची सविस्तर माहीती देवुन पाठया पुस्तके देवुन त्यांचे स्वागत करीत विद्यार्थ्यांशी हितगुज साधुन त्यांचे स्वागत केले.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!