नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतातून शिक्षण, काम किंवा पर्यटनाच्या उद्देशानं परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना नागरी उड्डाण मंत्रालयाकडून दिलासा देण्यात आला. या प्रवाशांना परवानगीसाठी नागरी विमान मंत्रालयाकडे अर्ज करण्याची गरज नाही ते थेट विमान कंपन्यांकडून आपली तिकीट बुक करू शकतात.
या अगोदर जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार, नागरी उड्डाण मंत्रालय किंवा मंत्रालयाद्वारे नामांकित एजन्सीमध्ये नागरिकांना आवश्यक माहितीसहीत अर्ज करावा लागेल. यात प्रस्थान आणि आगमन स्थळाच्या माहितीचाही समावेश होता.