पाचोरा, प्रतिनिधी । शब्दगंध समूह प्रकाशन, दैनिक स्वराज्य संस्था तथा ग्रंथमित्र युवा मंडळ औरंगाबाद यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२० गोंदेगाव येथील भूमिपुत्र आकाश दिपक महालपूरे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आकाश महालपुरे यांना ट्रस्टचे अध्यक्ष संदीप त्रिभुवन, नरूद्दीन मोल्लानी, अंकुश त्रिभुवन, दामोदर त्रिभुवन, सुशील वाघमारे, योगेश वैष्णव, विजय त्रिभुवन, संजय काळे, सुमन त्रिभुवन, संगीता दाभाडे, भगवान दाभाडे, सदाशिव बागडे, सुरेश त्रिभुवन यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. शब्दगंध समुह प्रकाशन, औरंगाबाद तर्फे दरवर्षी समाजप्रबोधन, साहित्य, कला, क्रिडा, संस्कृती, विज्ञान, संगीत आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस व संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सामाजिक परिवर्तनातून करत असलेल्या वैचारिक मांडणीच्या आधारावर साहित्यातील अनमोल कार्यामुळे आकाश महालपूरे हे प्रसिद्ध युवा साहित्यीक आहे. नुकतचं त्यांना आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल साहित्यरत्न पुरस्कार व काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आकाश महालपूरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.