जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज । शहरातील आंबेडकर मार्केट येथे एका गॅरेजच्या समोर उभी ४० हजारांची दुचाकी लांबविल्याप्रकरणी शुक्रवार, १७ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील लक्ष्मीनगरात युवराज सुदाम तळेले वय ५५ हे वास्तव्यास आहेत, त्यांचा मेसचालक आहेत. १५ मार्च रोजी युवराज तळेले हे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आंबेडकर मार्केट परिसरात आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ डीयू ३८१५) या क्रमाकांची दुचाकी एका गॅरेजसमोर उभी केली होती. अर्ध्यातासात पाच वाजेच्या सुमारास तळेले हे काम आटोपून परतले असता, गॅरेजसमोर रस्त्यालगत उभी दुचाकी दिसून आली नाही, सर्वत्र शोध घेतला, मात्र दोन दिवस उलटूनही दुचाकी मिळून न आल्याने युवराज तळेले यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.