आंतर शालेय मनपा स्तरीय हॉकी स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

मुलींमध्ये विद्या इंग्लिश, बेंडाळे, व अँग्लो उर्दू विजयी तर मुलांमध्ये विद्या व गोदावरी विजेते

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  आंतर शालेय मनपा स्तरीय हॉकी स्पर्धा १४,१७ व १९  वयोगटातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा  जिल्हा क्रीडा संकुल  येथे घेण्यात आल्या.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

आंतर शालेय मनपा स्तरीय हॉकी स्पर्धेत १४ वर्षे आतील मुलांच्या गटात गोदावरी विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजयी ठरले.  १७ वर्षे वयोगटात  मुलामध्ये विद्या इंग्लिश स्कूल विजयी व गोदावरी उपविजयी तर १९ वर्षे मुलांच्या गटात एकही संघाचे प्रवेश नाही.

 

१४ वर्ष वयोगटात मुली मध्ये विद्या इंग्लिश स्कूल विजयी तर गोदावरी उपविजयी, १७ वर्षे वयोगटात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे विजयी तर गोदावरी इंग्लिश मीडियम उपविजयी राहिले. तसेच १९ वर्षे आतील मुलींच्या गटात  अँग्लो उर्दू हायस्कूल जळगावने विजयी ठरली.

विजयी व उपविजयी संघातील प्रत्येक खेळाडूला सुवर्ण व रजत पदक स्पोर्ट्स हाऊस जळगावतर्फे देण्यात आले  बक्षीस वितरणास  जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्राय इव्हेंटच्या संचालिका यामिनी कुलकर्णी, जी डी बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका सरिता चीरमाडे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख व सहसचिव लीयाकत अल सय्यद यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक वसीम मिर्झा, युसुफ शेख, शहबाज शेख, विद्या बनसोड, मुजफ्फर शेख आदींची उपस्थिती होती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content