आंतरराष्ट्रीय धावपटू मिलखासिंग यांना भाजपातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा  महानगर व क्रीडा आघाडी तर्फे फ्लाईंग सिख भारताचे महान धावपटू सुवर्णपदक विजेते “मिल्खासिंग” यांना काव्यरत्नजली चौक येथे भाव पुर्ण श्रध्दांजली  अर्पण करण्यात आली. 

काव्यरत्नजली चौकात मेणबत्ती लावून  आदरांजली वाहण्यात आली.  याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी  यांचा मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.  याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी,  प्रदेश महिलां आघाडी  उपाध्यक्षा  उज्वला बेंडाळे, गट नेते भगत बालनी, जिल्हा पदाधिकारी सुशील हसवाणी, लीला चौधरी,  राहुल वाघ, मनोज भंडारकर, गणेश माळी ,धीरज वर्मा,  नगरसेवक धीरज सोनवणे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे,  युवा मोर्चा अध्यक्ष  आनंद सपकाळे,  सुरसिंग पाटील, संजय तिरमले, जयंत चव्हाण, गौरव पाटील, सिद्धार्थ सपकाळे, सचिन जगताप, नाना कोळी हे उपस्थिती होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!