अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अॅड.  ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड  परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.

 

बारावी परीक्षेत शाळेतून  यश महाजन ९४.२० प्रथम , पार्थ पंत ८८.८० द्वितीय,  पियुष चंद्रे ८७   तृतीय स्थान पटकविले आहे. तसेच  प्रथमेश कौजलगी ८४.२०, करिष्मा पाटील ८२.८०  यांनी यश संपादन केले आहे.

दहावीत प्रथम रुद्रेश गांगुर्डे ९७.४०, भक्ती मेटकर ९१.४०  द्वितीय तर तृतीयस्थान वसुंधरा शिंदे ८८ हिने पटकविले आहे. तसेच  स्नेहल पाटील ८४.६० ,  भूमिका डिंकराई ८०.८० या विद्यार्थिनीनी यश संपादन केले आहे.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष अॅड. ललिता पाटील, सचिव   प्रा. श्याम पाटील ,संचालक पराग पाटील, देवश्री पाटील व प्राचार्य विकास चौधरी सर तसेच सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.