अहमदनगरमध्ये भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीची आत्महत्या !

शेअर करा !

अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगरमध्ये भाडेकरु आणि घरमालकाच्या पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांनी विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी परिसरात बोरसेवाडी गावाजवळ हा प्रकार घडला. रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केलेली होती, त्यापासून १०० मीटर अंतरावर मृतदेह सापडले. दोघांचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. ३५ वर्षीय पुरुषाकडील कागदपत्राच्या आधारे इंद्रजित वाल्मिक इंगळे अशी त्यांची ओळख पटली. इंद्रजित यांच्यासह मृतावस्थेत सापडलेली महिला त्यांची सून नसल्याचे पोलिसांना समाजले. तेव्हा अधिक चौकशी केली असता संबंधित महिला इंद्रजित यांचे घरमालक बाळासाहेब सानप यांची पत्नी रेखा असल्याची माहिती मिळाली. ३० वर्षीय रेखा सानप बहिणीला भेटायला जामखेडला जाऊन येते, असे सांगून त्या निघाल्या होत्या.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!