अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जाळोद रोडवरून बेकायदेशीररित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून १२ लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना घडली आहे.

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील जाळोद रोड येथे अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली .त्यानुसार अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने कारवाई करण्याच्या सुचना दिली. पथकाने संशयित आरोपी तोफिक शेख मुशिउद्दीन रा. गांधीपुरा अमळनेर यांच्यासह इतर दोन जणांकडून सुमारे ५३ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त करून कारवाई केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीकडून वाहतूक करणारे वाहन, मोबाईल इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Protected Content