अवैधरित्या सिगारेट, गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या एका दुकानात प्रतिबंधित गुटखा, सिगारेट व  गुटखा विक्री करणाऱ्यांवर जिल्हापेठ पोलिसांची कारवाई केली आहे. याप्रकरणी  जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ एका दुकानाच्या आडोशाला एक जण प्रतिबंधित सिगारेट, गुटख्यासह पानमसाला विक्री करत असल्याची माहिती गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी संबंधित गुटखा, पानमसाला विक्री करणाऱ्या दत्तात्रय नामदेव चौधरी वय ४३ रा. विठ्ठलपेठ, जुने जळगाव याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून  सिगोटर, राजनिवास सुंगधीत पान मसाला, मिराज तंबाखू, गायछाप, तंबाखू अशी एकूण ८२ पाकिटे असा १ हजार ३७८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरुन दत्तात्रय नामदेव चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापूराव बडगुजर हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!