सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील तासखेडा उदळी रस्त्यावर अवैधरित्या मातीची उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर सावदा येथील तलाठी यांनी कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली आहे. या संदर्भात चालक व मालक यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील तासखेडा उदळी रस्त्यावर शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री १० वाजता मातीचे उत्खनन करून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीव्ही १३९६)मध्ये भरून वाहतूक करत असल्याची माहिती सावदा तलाठी कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री १० वाजता कारवाई करत ट्रॅक्टर आणि जेसीबी ताब्यात घेतले आहे. यामध्ये जेसीबी चालक प्रकाश अरुण कोळी (वय-२४) रा. पुरी ता. रावेर, ट्रॅक्टर चालक महेंद्र भागवत कोळी रा. तांदलवाडी ता. रावेर आणि दोन्ही वाहनांचा मालक किशोर नारायण चौधरी (वय-४८) रा. तांदलवाडी ता.रावेर या दोघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे माती वाहतुकीचा परवाना संदर्भात माहिती विचारली. त्यांच्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती, त्यानुसार महसूल कर्मचाऱ्यांनी सदरील ट्रॅक्टर आणि जेसीबी हे सावदा पोलीस ठाण्यात जमा केले. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.