अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची बंद नका करू शिष्यवृत्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाने अल्पसंख्यांक स्कॉलरशिप नोटिफिकेशन जारी करून बंद केले आहे. ती बंद करून नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम बांधवांच्या वतीने सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्यांक समाज हा शिक्षणाच्या माध्यमाने आपली प्रगती करू शकला तर निश्चितच तो भारत देशाच्या विकासात सुद्धा सहभागी राहील त्यामुळे केंद्र शासनाने जारी केलेले नोटिफिकेशन त्वरित रद्द करावे अशी मागणी करण्यात आली. जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सोमवारी २८ नोव्हेंबर रेाजी दुपारी ४ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, जळगाव जिल्हा मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सहसचिव बाबा देशमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पार्टीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, एमआयएम पार्टीचे नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष शेरा भाई, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकिर पठाण व सिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अन्वर खान यांची उपस्थिती होती.

Protected Content