अल्पशा आजाराने मृत्यू झालेल्या होमगार्डच्या परिवाराला होमगार्ड पथकातर्फे आर्थिक मदत

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील अल्पशा आजाराने निधन झालेले होमगार्ड सुरेश महारु पांचाळ यांच्या कुटुंबियांना आर्थक मदत देण्यात आली.  या उपक्रमामुळे पांचाळ यांच्या परिवाराला मोलाची मदत झाली

होमगार्ड पथकातर्फे अल्पशा आजाराने निधन झालेले होमगार्ड सुरेश पांचाळ यांच्या धर्मपत्नीस  पंधरा हजार एक रुपये रकमेची आर्थिक मदत करण्यात  आली. याप्रसंगी तालुका समादेशक अधिकारी प्रवीण ढाकणे, गुलाब चौधरी, सतीश महाजन, जीवन मोरे, गोविंद साळी, शेख रशीद , रमजान दैवते, दिनेश पाटील, कुमुदिनी सोनार, सोपान पाटील  आदी होमगार्ड उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.