अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

एका प्रौढाविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातून पायी जात असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी मंगळवार 10 जानेवारी रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील एका भागात 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी वास्तवास आहे. मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थी ही जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातून जात होती. यादरम्यान 42 वर्षीय प्रौढाने अल्पवयीन विद्यार्थीच्या समोर येऊन तिच्यासोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग करणाऱ्या राजेंद्र विश्वनाथ भगत वय 42 याच्या विरोधात रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content