अल्पवयीन मुलीवर ७० वर्षीय वृद्धाचा बलात्कार

 

पुणे : वृत्तसंस्था । आई-वडिल घरी नसताना एका दहा वर्षाच्या मुलीवर सत्तर वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिसोळी येथे घडला.

 

अल्पवयीन मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दिलीप निवृत्ती आडागळे (वय ७०, रा. पिसोळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची तोंडओळख आहे. सात जूनच्या दिवशी फिर्यादी आणि त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या गोष्टी गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस पैसे दिले आणि त्यांच्याच घरात तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. दरम्यान, त्याच वेळेला फिर्यादी घरी परतल्या असता, त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

 

 

आरोपीने यापूर्वी देखील असा प्रकार वेळोवेळी केला असल्याचे पीडित मुलीने सांगितले. कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.